प्रेम कोणत्याही वयात, कुठेही, कधीही होऊ शकतं यांची मजेशीर गोष्ट सांगणार चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सर्वांचं मनोरंजन करणारा एक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटात विनोद, मजा मस्ती नात्यातील गोडवा, प्रेम सगळं काही दाखवण्यात आलं आहे.