
Marathi Entertainment News : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित 'गुलकंद' या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं 'चंचल' नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातील या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश - विश्वजीत यांनी संगीत दिले आहे.