

gulshan kumar
esakal
टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या ही नव्वदच्या दशकातील सर्वांत मोठ्या खळबळजनक घटनांपैकी एक मानली जाते. ऑगस्ट १९९७ मध्ये मुंबईच्या जोगेश्वरी भागात असलेल्या जितेश्वर महादेव मंदिरासमोर दुपारीच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दररोज सकाळी मंदिरात दर्शन घेणे हे त्यांच्या नित्यनेमाचा भाग होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकूण सोळा गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेने संपूर्ण बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. आता या हत्येला अठ्ठावीस वर्षे उलटून गेल्यानंतर काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.