Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

MARATHI ACTOR TO PLAY LEAD IN SCAM 2010: हंसल मेहता यांच्या 'स्कॅम २०१०' या वेब सीरिजची पहिली झलक समोर आलीये. यात मुख्य भूमिकेत एक मराठी अभिनेता दिसतोय.
Siddharth Bodke in Scam 2010 Subrata Roy role

Siddharth Bodke as Subrata Roy in Scam 2010 web series

ESAKAL

Updated on

यापूर्वी अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा रोवलाय. त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना कौतुकही मिळालंय. प्रिया बापट, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, वैभव तत्ववादी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तिथे नाव कमावलंय. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. नुकताच हंसल मेहता यांच्या 'स्कॅम २०१०' या सीरिजचा पहिला लूक समोर आलाय. महत्वाचं म्हणजे यात लोकप्रिय मराठी अभिनेता मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या अभिनेत्याची पत्नी मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कोण आहे तो?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com