

hanuman ansh ott release
esakal
चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं बजेट असणं गरजेचं नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हनुमान अंश'. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल ४५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काही आठवड्यांत चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा आलेख झपाट्याने वाढला आणि त्याने अनपेक्षित यश मिळवलं.