

Happy Patel Movie Release Date
esakal
Bollywood News : आमिर खानच्या नवीन धमाकेदार गुप्तहेर चित्रपट हॅपी पटेल ची घोषणा अखेर करण्यात आली आहे. हा चित्रपट वीर दासच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा टप्पा ठरतो, ज्यात वीर दास आणि मोना सिंग लीड रोलमध्ये दिसणार आहेत. शीर्षक जितकं मजेदार आहे, तसंच मेकर्सनी रिलीज केलेलं अनाउन्समेंट व्हिडिओही तितकंच मजेदार आहे, ज्यात आमिर खान आणि वीर दास दिसतात.