तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा घराघरात पोहचलाय. अंजली बाई आणि राणादाची जोडी प्रत्येकालाच आवडायची. राणादाचं अंजली बाईवर असलेलं प्रेम सर्वांनीच पाहलं आहे. या जोडीने कालातंराने खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र येत लग्न केलं. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर हार्दिक जोशी याला वेगळी ओळख मिळाली. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.