HARSHVARDHAN RANE SANJEEDA SHEIKH
esakal
HARSHVARDHAN RANE SANJEEDA SHEIKH PANSHET VACATION RUMOURS: बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चा अनेकदा त्यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमधून सुरू होतात. सध्या अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री संजीदा शेख यांच्या काही पोस्ट्समुळेही अशाच चर्चाना उधाण आले आहे. दोघांनी एकाच ठिकाणी सुट्टी घालवली आहे का आणि त्यांच्या नात्याला मैत्रीपलीकडे काही वेगळं वळण मिळाले आहे का, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे; मात्र दोन्ही कलाकारांनी त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.