Chandane Shimpit Ja: "हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली..." या गाजलेल्या गाण्यातील बालकलाकार बनली नेपाळी अभिनेत्री ; गायिका आणि डान्सर असलेली अभिनेत्री आता दिसते अशी !

'Chandane Shimpit Jashi' Fame Actress's Unbelievable Transformation: 'चांदणे शिंपीत जा' या सिनेमातील 'हे चांदणे फुलांनी' हे गाणं खूप गाजलं होतं. ज्या बालकलाकावर हे गाणं चित्रित झालं होतं ती आता काय करते जाणून घेऊया.
Chandane Shimpit Ja
Chandane Shimpit JaEsakal

Chandane Shimpit Ja : ७०-८० च्या दशकात निर्मिती झालेले अनेक मराठी सिनेमे खूप गाजले. यातीलच एक होता १९८२ साली प्रदर्शित झालेला 'चांदणे शिंपीत जा' (Chandane Shimpit Ja) हा सिनेमा. या सिनेमातील 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली' हे गाणं खूप गाजलं. हे गाणं चित्रित झालं होतं तृप्ती नाडकर (Tripti Nadkar) या त्या काळी बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्रीवर. तृप्ती आता काय करतात जाणून घेऊया.

बालकलाकार ते नेपाळी अभिनेत्री

तृप्ती यांच्या वडिलांचं बालपण, शिक्षण महाराष्ट्रात झालं आणि पुढे ते दार्जिलिंग इथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी मायादेवी या गायिकेबरोबर लग्न केलं आणि २ जानेवारी १९६९ रोजी तृप्ती यांचा जन्म झाला. तृप्ती या जोडप्याची एकुलती एक मुलगी होती. थोडं मोठं झल्यावर तृप्ती यांनी बालकलाकार म्हणून सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. चांदणे शिंपीत जा, घरचा भेदी (Gharacha Bhedi) या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. चांदणे शिंपीत जा सिनेमातील हे चांदणे फुलांनी हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं खूप गाजलं होतं. या सिनेमात आशालता वाबगावकर, आशा काळे, महेश कोठारे, रवींद्र महाजनी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

तर अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. 'गोदाम' या हिंदी सिनेमातील त्यांचा अभिनय गाजला होता.

पण पुढे त्यांनी नेपाळी सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द घडवली. बाराहून अधिक नेपाळी सिनेमांमध्ये काम केलं. कुसुमे रुमाल (Kusume Rumal) हा त्यांचा पहिला नेपाळी सिनेमा होता. या सिनेमात काम करतेवेळी त्यांचं वय फक्त १५ वर्षं होतं.

भरमसाठ मानधन आणि लोकप्रियता

नेपाळी सिनेविश्वात तृप्ती यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांचे सगळे सिनेमे सुपरहिट ठरले. त्यांना नेपाळी अजिबात बोलता यायचं नाही. त्यांचे सगळे संवाद डब केले जायचे तरीही त्या नेपाळमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्या काळी त्या एका सिनेमासाठी दीड लाख रुपये मानधन घ्यायच्या.

Chandane Shimpit Ja
Ravindra Mahajani: योग्य वेळ आली की.. वडील रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया

लग्नानंतर सिनेविश्वाला रामराम

तृप्ती यांनी मुंबईस्थित इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा बिझनेस असलेल्या एका व्यावसायिकांशी लग्न केलं आणि सिनेविश्वाला रामराम केला. त्यांना दोन मुलं असून त्यांचा मोठा मुलगा 'तृप्तीज डान्स क्लासेस' नावाने डान्स क्लास चालवतो तर त्यांचा लहान मुलगा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

अभिनयातून ब्रेक घेतलेल्या तृप्ती यांनी अनेक वर्षांनी "आमको काख" या चित्रपटात पुनरागमन केलं. "कुसुमे रुमाल २", "कोही मेरो " अशा आणखी सिनेमात त्यांनी अभिनय केला.

सोशल मीडियावरही तृप्ती सक्रिय असून त्या त्यांच्या गाण्याचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असतात. फक्त एका मराठी गाण्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा मराठी सिनेमात काम करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे.

Chandane Shimpit Ja
Asha Kale : ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com