Kushal Badrike Emotional Post
Kushal Badrike Emotional PostEsakal

Kushal Badrike : "मी असाच एका edgeवर..." ; आयुष्यातील नाती आणि मैत्रीवर कुशल झाला व्यक्त...

Kushal Badrike Social Media Post : अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये त्याने नाती आणि मैत्रीवर भाष्य केलं आहे.

Kushal Badrike Post : उत्तम अभिनेता आणि तितकाच उत्तम कॉमेडी सेन्स असलेला कलाकार म्हणून कुशलने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदाच्या टायमिंगवर सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडणारा कुशल त्याच्या मार्मिक पोस्टमधून लोकांच्या मनाचा ठावही घेतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कुशलची पोस्ट

कुशलने सोशल मीडियावर त्याचा एका डोंगरच्या कड्यावर उभा राहिलेला फोटो शेअर केला असून त्याला "रवा उंच कड्यावरून धुकं बघत होतो काही वेळ . धो…धो.. पाऊस पडला, धुकं दाट झालं आणि मग हळू हळू विरळ होत दरीत कोसळून गेलं. आता सगळं स्पष्ट दिसू लागलंय .
काही नात्यांच्या बाबतीतही मी असाच एका edge वर उभा आहे . बघू ... मैत्रीचं, प्रेमाचं धुकं भरून टाकतं आभाळ का मग कोसळून जातंय दरीत…..!" असं कॅप्शन दिल आहे. सोबतच त्याने त्याचे आणखीही फोटो शेअर केले आहेत.

कुशलने शेअर केलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

कुशलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याची विचारपूस केली आणि त्याच्या मित्रांबाबत सल्ला देण्याचा प्रयत्न केला. "धो धो पाऊसात आणि नंतर पडणाऱ्या धुक्यात सगळं सुंदर वाटतं पण ते क्षणिक सुख देणार असतं
मग जो सूर्याचा किरण येतो आणि सगळं स्पष्ट दिसू लागत ती म्हणजे मैत्री
सर्व खोट्या धुक्याना बाजूला करून स्पष्टता आयुष्यात आणते तिच खरी मैत्री" अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली आहे तर एकाने "तू खूप मार्मिक लिहिलं आहेस" असं म्हंटलं तर एकाने" तू टेन्शन घेऊ नकोस" असा सल्लाही दिला.

Kushal Post's comments
Kushal Post's comments

सध्या कुशल सोनी हिंदी टेलिव्हिजन चॅनेलवर मॅडनेस मचायेंगे या कार्यक्रमात करत असून सोशल मीडियावर त्याचे या कार्यक्रमातील स्किट्स खूप गाजतात. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर हेमांगी कवी आणि गौरव मोरे हे मराठी कलाकारही काम करत आहेत.

Kushal Badrike Emotional Post
Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com