Hema Malini Never Visited In-Laws Despite 10-Minute Distance
esakal
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी एकेकाळी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलय. त्यांच्या अभिनयाचे आणि त्यांच्या सौदर्याचे लाखो चाहते आहेत. सध्या हेमा मालिनी सिनेमामध्ये कमी दिसत असली तरी एक काळ असा होता, ज्यावेळी हेमा मालिनीशिवाय सिनेमा पुर्ण होत नव्हता. तिची फॅन्स फॉलविंग आजही तितकीच आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात. आज हेमा मालिनी यांचा वाढदिवस. आज त्या 77 वर्षाच्या झाल्या.