

Kranti Jyoti Vidyalaya Marathi Madhyam Teaser Out
esakal
Marathi Entertainment News : मराठी शाळांची घटती संख्या, खालावलेली पटसंख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाची कमी होत जाणारी आवड… या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा प्रचंड मनोरंजक असा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.