
Bollywood Entertainment News : 'ये रिश्ता क्या केहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सतत काही ना काही कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असते. पण हिना गेले वर्षभर चर्चेत आहे ते कॅन्सरशी देत असलेल्या लढ्यामुळे. काही महिन्यांपूर्वी हिनाला तिसऱ्या स्तराचा स्तनाचा कर्करोग (breast cancer) असल्याचं निदान झालं. त्यानंतर ती धीराने त्या आजाराशी करत असलेला आणि तिचा प्रवास कौतुकास्पद ठरला आहे.