
राकेश पांडे हे हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जात होते. या अभिनेत्याने आता जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.