

Kantara Film Makers Collab With Bhadipa For Producing Marathi Film
esakal
Entertainment News : कांतारा सिनेमाचे निर्माते होम्बाळे फिल्म्सने भाडिपाशी भागीदारी करत त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमाची घोषणा केली. ‘येतो का नाय - पहिला वार' असं या सिनेमाचं नाव आहे. भाडिपाचा फाउंडर आणि अभिनेता, दिग्दर्शक सारंग साठे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. सोशल मीडियावर या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं.