अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांचं त्रिकुट असलेला हाऊसफुल 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दरम्यान या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटीची कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी 30 कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी चित्रपाटी कमाई ही 25 टक्के जास्त आहे. दोन्ही दिवसाची मिळून चित्रपटाचं कलेक्शन 54 कोटी इतकं झालंय.