बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चित्रपट 'हाउसफुल 5' मुळे चर्चेत आहे. 6 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दरम्यान प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात, हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमारने आगळी-वेगळी आयडिया वापरली. त्याने चित्रपटात वापरलेला 'किलर मास्क' घालून चक्क थिएटरबाहेर प्रेक्षकांमध्ये पोहोचला आणि थेट त्यांच्याकडून चित्रपटाचा रिव्ह्यू विचारला.