

DHARMENDRA HOSPITAL CHARGES
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. आज १० नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर हे व्हेंटिलेटरवर असल्याचंही सांगितलं गेलं. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली. त्यांच्यवर मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र ते व्हेंटीलेटरवर असल्याची बातमी खोटी असल्याचं सनी देओल याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. असं असलं तरी ३१ ऑक्टोबरपासून धर्मेंद्र हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मात्र या इस्पितळातील एका रूमचं भाडं किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?