Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

This is how Met Gala invented : मेट गाला २०२४ या कार्यक्रमाची चर्चा सध्या जागतिक स्तरावर होतेय. जाणून घेऊया या कार्यक्रमाचा रंजक इतिहास.
Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

गेल्या आठवड्याभरापासून सगळ्या माध्यमांवर मेट गाला २०२४ची चर्चा आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात पार पडणाऱ्या या चॅरिटी पार्टीला आता गेल्या काही वर्षांमध्ये उत्सवाचं रूप आलंय. जागतिक स्तरावरील अनेक सेलिब्रिटीज या उत्सवाला सगळ्यात महागडे आणि हटके कपडे परिधान करून हजेरी लावतात. रेड कार्पेटवरील त्यांच्या लुक्सची चर्चाही वेगवेगळ्या पातळीवर केली जाते.

फॅशन डिझायनर्ससाठी मेट गाला आता प्रतिष्ठेचा समारंभ ठरत चाललाय पण याची सुरुवात कशी झाली आणि आता 'फॅशनमधील ऑस्कर' म्हणून या सोहळ्याने कशी ओळख मिळवली जाणून घेऊया.

स्थानिक स्तरावरील कार्यक्रम म्हणून झाली सुरुवात

जगभरात ओळख मिळवणाऱ्या या मेट गालाची सुरुवात १९४८ साली झाली. त्यावेळी या कार्यक्रमाला कुणीही 'ए लिस्ट' पाहुणेमंडळी हजेरी लावायचे नाहीत किंवा कुणी स्पॉन्सर्सही नव्हते. अप्पर ईस्ट भागातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर फॅशनच्या प्रदर्शनाचं आयोजन या शोमार्फत केलं जायचं पण हा शो सुरुवातीपासूनच ग्लॅमरस असायचा. पण हा स्थानिक पातळीवरील कार्यक्रम आताच्या युगातील महत्त्वाचा सोहळा बनवण्यासाठी कित्येक दशक केलेली योजना आणि हॉलीवूडशी काळजीपूर्वक वाढवलेले संबंध कामी आले.

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास
Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

संस्थेच्या मदतीसाठी सुरु झालेला कार्यक्रम बनला फॅशनमधील ऑस्कर

म्युझियम ऑफ कॉस्च्युम आर्ट्समधून मेट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटची निर्मिती झाली. ही लायब्ररी नाट्य पोशाखांच्या कलेसाठी समर्पित आहे. 1946 मध्ये लॉर्ड अँड टेलरचे अध्यक्ष डोरोथी शेव्हर यांनी हा संग्रह मेटमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. ही फॅशन जपण्यासाठी डोरोथी यांना सांस्कृतिक सहभागाची गरज वाटली. हा इतिहास जपण्यासाठी आणि कला जोपासण्यासाठी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण वार्षिक ऑपरेटिंग बजेटसाठी निधी उभारण्यासाठी अमेरिकन फॅशन इंडस्ट्रीवर जबाबदारी सोपवत मेटने हे कलेक्शन जपण्याची तयारी दर्शवली. या गरजेतूनच या मेट गालाची निर्मिती झाली. हा कार्यक्रम बराच काळ स्थानिक पातळीवरच सुरु होता.

1974 मध्ये, डायना व्रीलँड व्होगच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी विशेष सल्लागार म्हणून मेटमध्ये आल्या. तेथे त्या मुख्य संपादक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी हा सोहळ्याला साजरी करण्यासाठी थीम ठेवायची कल्पना सुचवली. त्यानंतरच्या पहिल्या सोहळ्याची थीम होती “बॅलेन्सियागाचे जग”. डायना यांनी आयोजित केलेल्या सगळ्या पार्ट्या या भव्य आणि रोमँटिक असायच्या. त्यांनीच पहिल्यांदा अनेक हॉलिवूड स्टार्सना या सोहळ्यात आमंत्रित केलं. अँडी वॉरहोल, डायना रॉस आणि चेर सारख्या प्रमुख लोकप्रिय कलाकारांनी यांनी पहिल्यांदा हेन्री किसिंजर यांच्यासोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली.

1989 मध्ये व्रीलँडच्या मृत्यूनंतर अॅना विंटरला मेट गाला आयोजित करण्याचा बहुमान मिळाला. पण या मेट गालामध्ये भव्यता आणि मॉडर्न गोष्टींची ओळख करून दिली ती एलिझाबेथ टिल्बेरिस हिने. डियोरने स्पॉन्सर केलेल्या या मेट गाल्याला डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्सने हजेरी लावली होती. किंग चार्ल्सपासून घटस्फोट घेतल्यानंतर, गॅलियानो-डिझाइन केलेल्या निळ्या सॅटिन स्लिप गाउनमध्ये तिने या सोहळ्याला हजेरी लावली होती आणि त्यामुळे जगभरात चांगलीच खळबळ उडाली होती.

यानंतर ॲना विंटूर यांच्याकडेच या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी आली. त्यांच्या कारकिर्दीत, व्होगचे कव्हर स्टार मॉडेल्सपासून अभिनेत्रींपर्यंत गेलं. मेट गालामध्ये हजेरी लावून व्होगच्या कव्हरवर येण्याचा बहुमान मिळेल या आशेवर अनेक कलाकार या सोहळ्याला हजेरी लावू लागले.

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास
Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

पुढे सोशल मीडियाच्या जमान्यात या पार्टीला अजून प्रसिद्धी मिळाली आणि जगभरातील सेलिब्रिटीज, फॅशन डिझायनर्स या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले. बरेच सेलिब्रिटीज तर त्यांची इमेज बिल्ड करण्यासाठीही या सोहळ्याला हजेरी लावतात. बोल्ड आणि हटके फॅशनमधून त्यांचं बदललेलं रूप आणि इंडस्ट्रीतील त्यांच्या इमेजबाबत असलेल्या गोष्टी बदलण्यासाठी हा सोहळा प्रामुख्याने ओळखला जातो.

अनेक भारतीय आणि एशियन स्टार्स या सोहळ्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठीचं दार समजतात. त्यामुळेच त्याची 'फॅशनमधील ऑस्कर' म्हणून ओळख झाली आहे. आजवर दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींनी मेट गाला मध्ये हजेरी लावत सगळ्यांची मन जिंकली आहेत.

निसर्गावर आधारित या वर्षीची थीम

यावर्षी मेट गालामध्ये म्युझियममध्ये असलेल्या सगळ्यात जुन्या आणि नाजूक कपड्यांचं प्रदर्शन या निमित्ताने भरवलं जाणार आहे आणि सेलिब्रिटीजना जे. जी बॅलर्ड यांच्या कथेवर आधारित गार्डन ऑफ टाइम ही निसर्गावर आधारित थीम देण्यात आली होती. अनेक सेलिब्रिटीजनी फॅशनच्या माध्यमातून निसर्गाला मानवंदना देण्याचा प्रयत्न केला.

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास
Met Gala 2023 : इव्हेंट'मध्ये गंगूबाईचा जलवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com