War 2: 'वॉर-2' च्या सेटवरील फोटो लीक; हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरच्या लूकनं वेधलं लक्ष

War 2: फोटोमधील हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
War 2
War 2esakal

War 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr. N.T.R) 'वॉर 2' (War 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी शूटिंग सुरु झाले आहे. आता या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो ऑनलाइन लीक झाली आहेत, ज्यामध्ये चाहत्यांना या चित्रपटाच्या ॲक्शनपटाची झलक मिळाली आहे. या फोटोमधील हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांनी 'वॉर 2' या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात केली आहे. आता वॉर-2 या चित्रपटाच्या सेटवरील लीक झालेल्या फोटोमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत, ज्युनियर एनटीआर हा 'वॉर 2' या चित्रपटाच्या सेटवर कॅज्युअल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. तर हृतिक हा देखील डॅशिंग लूकमध्ये दिसला. हृतिक आणि ज्युनियर एनटीआरच्या व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नेटकऱ्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

War 2
'Hrithik Roshan Post : '12 th फेल' पाहिल्यानंतर 'फायटर' ऋतिक झाला भावूक, काय म्हणाला माहितीये?

'वॉर 2' हा 'वॉर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. 2019 मध्ये वॉर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ज्युनियर एनटीआर काम करत असल्यानं प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

कधी रिलीज होणार वॉर-2?

'वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते, तर वॉर-2 या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. 'वॉर 2' या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'वॉर' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता, ज्याने रिलीजच्या एका आठवड्यात 200 कोटींची कमाई केली होती. आता 'वॉर 2' हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

War 2
Devara Teaser: रक्तात मिसळलेला 'लाल समुद्र' अन् तो... Jr. NTR च्या देवराचा थरारक टीझर बघाच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com