

HRUTA DURGULE
ESAKAL
'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. ती आजही महाराष्ट्राची क्रश आहे. तिची 'मन उडू उडू झालं' ही मालिकादेखील प्रचंड गाजली. तिने मालिकांनंतर रंगभूमी आणि चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ती लवकरच 'उत्तर' या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे देखील आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ती ठिकठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. अशाच एका मुलाखतीत तिने आई होण्याबद्दल भाष्य केलंय. ती आई कधी होणार याबद्दल तिने तिचं मत मांडलंय.