Hruta Durgule

'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने मालिकांनंतर आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. हृताने 'आरपार', 'कन्नी', 'अनन्या', 'टाइमपास ३' अशा अनेक चित्रपटात काम केलंय. तिच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक होतं. हृताच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com