

hruta durgule
esakal
'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने मालिकांनंतर आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. हृताने 'आरपार', 'कन्नी', 'अनन्या', 'टाइमपास ३' अशा अनेक चित्रपटात काम केलंय. तिच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक होतं. हृताच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. हृता आणि ललित प्रभाकरचा 'आरपार' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. एका मुलाखतीत तिने तिच्या रिलेशनशिपबद्दलच्या संकल्पना सांगितल्या आहेत. एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आपण राहू शकत नाही असं ती म्हणाली आहे.