
Entertainment News : भारतीय संगीतविश्वातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देवी सरस्वतीचा दर्जा दिला जातो. आज लता मंगेशकर यांचा तिसरा स्मृतिदिन. 6 फेब्रुवारी 2022 ला लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि संगीतविश्वात कायमच पोकळी निर्माण झाली. 36 भारतीय भाषांमध्ये अनेक गाणी गाणाऱ्या या गानकोकिळेला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं.