
Sangit Manapman Marathi Movie: अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत वगैरे अशा बातम्या माध्यमांमधून अनेक वेळेला ऐकायला मिळतात. मग त्यावर अनेक नामांकीत वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र भरतात. वेगवेगळे चित्रपट समीक्षक चर्चा करतात. या सगळ्या चंदेरी दुनियेचा झगमगटात, मराठी कलाकार तसेच चित्रपटांवर बहुतांश प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळते.
मराठी चित्रपटांच्या विषयांची निवड ही कौटुंबिक प्रेम, विनोद किंवा स्त्री व्यक्तिरेखांशी निगडित याच परिघात बांधली जाते. अनेकदा दक्षिणात्य चित्रपटांचा संदर्भ देऊन मराठी चित्रपटांनी त्या धर्तीवर आशय निर्मिती करावी, असे देखील म्हटले जाते. हे त्या चाणक्य समीक्षकांच्या दृष्टीने कदाचित योग्य असेलही परंतू माझ्यासारख्या एका छोट्या आणि पत्रकारितेच्या अगदी लहान शिकाऊ उमेदवार असलेल्या पामराला तसं वाटत नाही.