

sulbha arya
esakal
'वीण दोघातली ही तुटेना' मधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या कलाकारांमधील प्रेक्षकांचं आणखी एक आवडतं पात्र म्हणजे सुबोध भावे याच्या आजीचं. आपल्या नातवाच्या चांगल्या आयुष्यसाठी धडपडणारी आजी या मालिकेत पाहायला मिळतेय. या मालिकेत हे पात्र अभिनेत्री सुलभा आर्या यांनी साकारलं आहे. त्या 'कल हो ना हो' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितलीये. जी ऐकून सगळेच चकीत झालेत. त्यांनी आंतरधर्मीय विवाहकेला होता. तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती हे त्यांनी सांगितलंय.