भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

BHONDU MANOHAR MAMA INDUSTRY CONNECTION: भोंदू मनोहर मामा याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर एका मराठी अभिनेत्याने मराठी मालिकेसाठी हाच व्यक्ती पैसे असल्याचा संशय व्यक्त केलाय.
manohar mama bhosale industry connection

manohar mama bhosale industry connection

esakal

Updated on

सध्या सगळीकडे भोंदूबाबा मनोहर मामा याची चर्चा आहे. इंदापूरच्या लारसूणे गावातला मनोहर भोसले सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. तो गावातून पळूनही गेलेला. मात्र काही वर्षांनी तो एक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बनून याच गावात परत आला. आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न आहेत असं सांगून त्याने अनेकांना फसवलं. आता एका अभिनेत्याने या मनोहरने एका लोकप्रिय मालिकेला फंडिंग दिलं असल्याचं म्हटलंय. हा अभिनेता आहे ओंकार कर्वे. त्याने 'उधे गं अंबे' मालिकेसोबतच अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता त्याने केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय बनलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com