'लक्ष्मी निवास' मालिकेत विकृत जयंत नेहमीच जान्हवीला काही ना काही शिक्षा देताना दाखवण्यात आलाय. अशातच भावना आणि आनंदी जान्हवीच्या घरी राहायला येतात. भावनाचं मन शांत व्हावं म्हणून श्रीनिवास काही दिवस तिला जान्हवीकडे राहायला जाण्यासाठी सांगतो. अनपेक्षितपणे जयंत सुद्धा भावना आणि आनंदीला राहण्यासाठी परवानगी देतो.