Janhvi Kapoor News : जान्हवीसोबत इब्राहिमचा सिनेमा येणार? ‘या’ सिनेमातून पदार्पण करतोय सैफचा लेक

सारा अली खान नंतर तिचा धाकटा भाऊ इब्राहिमसुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.
Janhvi Kapoor Ibrahim Ali Khan together in their next film marathi Entertainment news
Janhvi Kapoor Ibrahim Ali Khan together in their next film marathi Entertainment news Esakal

सारा अली खान नंतर तिचा धाकटा भाऊ इब्राहिमसुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. गेल्या काही महिन्यांपासून इब्राहिमच्या बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चा सुरु आहेत. सरजमीन या सिनेमातून पदार्पण करत असल्याची बातमी गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहे पण यासोबतच तो आणखी एका सिनेमात दिसणार असल्याची चर्चा रंगली होती.

इब्राहिम लवकरच एका सिनेमातून पदार्पण करत असून या सिनेमात तो जान्हवी कपूर आणि महिमा मकवाना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण नुकत्याच आलेल्या इ टाइम्सच्या रिपोर्टनुसार ही बातमी खोटी असून असा कोणताही सिनेमा बनत नाहीये.

हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राने याबाबतची बातमी शेअर केली होती. या बातमीमध्ये असं म्हंटलं होत कि, जान्हवी, महिमा आणि इब्राहिम एका रॉम-कॉम सिनेमात काम करणार असून लव्ह ट्रँगलवर हा सिनेमा आधारित असेल आणि शशांक खैतान या सिनेमाचं दिग्दर्शन करतील. सध्या फक्त सुरुवातीची बोलणी सुरु असून अजून सिनेमावर काहीही काम सुरु झाल नसल्याचं म्हंटलं होत. हा सिनेमा ‘मैं तेरा हिरो’ या सिनेमाप्रमाणे लव्ह ट्रँगलवर आधारित असणार होता आणि इब्राहिमचा भूमिका देखील वेगळी असणार होती. पण आता सूत्रांनी असा कोणताही सिनेमा बनणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Janhvi Kapoor Ibrahim Ali Khan together in their next film marathi Entertainment news
EPFO: पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले, एवढी रक्कम काढता येणार

दरम्यान इब्राहिम ‘सरजमीन’ या सिनेमातून पदार्पण करणार असून या सिनेमात अभिनेत्री काजोलसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करत असून बोमन इराणी यांचा मुलगा कयोंझी इराणी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. कयोझीने या आधी स्टुडंट ऑफ दि इयर या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याने सुडो ही भूमिका साकारली होती.

Janhvi Kapoor Ibrahim Ali Khan together in their next film marathi Entertainment news
Delhi Waqf Board Scam : 'आप'ला पुन्हा मोठा धक्का! वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणी अमानतुल्लाह खान यांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com