जान्हवी कपूर चित्रपटासोबतच पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा 'देवारा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याला सुद्धा प्रेक्षकांनी खूप पसंती दाखवली. दरम्यान जान्हवीचा आता 'परम सुंदरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीने तिची पर्सनल लाईफबद्दलचा एका किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.