मराठी सिनेसृष्टीत भयावह चित्रपट मोजकेच आहेत. परंतु त्याची भयाची परिभाषा काही वेगळीच आहे. अशातच भयाची नवीन परिभाषा घेऊन येणारा जारण चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून या चित्रपटात अमृता सुभाषसह अनिता दाते यांचा भयावह अवतार पहायला मिळाला आहे. 5 जून 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.