

Why Didn't 'Ramayana' Songs Become Hits? Javed Akhtar Gives a Witty Reply
esakal
Why Didn't 'Ramayana' Songs Become Hits?: बॉलीवूडचे दिग्गज गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी नुकतीच दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण: राइज ऑफ ए लीजेंड' (Ramayana) या चित्रपटाबाबत महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. त्यांनी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही, पण त्यांची मुलगी आणि चित्रपट निर्माती झोया अख्तर हिने हा सिनेमा पाहिला असून तिने त्याचे कौतुक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 'रामायण'च्या संगीताला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याबाबत त्यांनी एका कार्यक्रमात मजेशीर शैलीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'इंडियन परफॉर्मिंग राइट सोसाइटी' (IPRS) च्या 'म्यूजिक क्रिएटर रिपोर्ट' लाँचिंग सोहळ्यात जावेद अख्तर उपस्थित होते. यावेळी त्यांनी चित्रपट, संगीत आणि भगवान रामाच्या आदर्श विचारांवर सविस्तर चर्चा केली.