Jaya Bachchan Health : 'चिडका स्वभाव नव्हे, तर गंभीर आजार!' जया बच्चन यांच्याबद्दल मुलांनी सांगितली खरी गोष्ट
Jaya Bachchan Health : जया बच्चन या नेहमी कोणावर ना कोणावर चिडचिड करताना दिसत असतात. दरम्यान श्वेता आणि अभिषेक यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलंय की, 'जया बच्चन यांना गंभीर आजार आहे. म्हणून त्या चिडचिड करतात.'
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या चिडक्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे चिडचिड करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या नेहमी मीडिया, पपाराझी, चाहत्यांशी चिडचिड करताना पहायला मिळतात.