

jaya bachchan wallpaper
esakal
बॉलिवूडच्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वागण्याचीच चर्चा जास्त होत असते. त्या अनेकदा पापाराझींसोबत चुकीच्या पद्धतीने बोलण्यासाठी आणि त्यांना ओरडण्यासाठी चर्चेत आल्या होत्या. आताही त्यांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या नेहमीच त्यांच्या वादासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या वागण्यावरून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी त्याच कारणीभूत आहेत, त्या ऐश्वर्याला सून म्हणून नीट वागवत नाहीत असं नेटकरी सर्रास बोलताना दिसतात. आता हीच गोष्ट सिद्ध करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय.