प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी अहवालात म्हटलं आहे. दरम्यान या घटनेनंतर समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. ते मृतदेह नदीत फेकून दिल्यामुळं प्रयागराजच्या नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे.' असा दावा जया बच्चन यांनी केला आहे. दरम्यान यावर बिहारच्या सोनू निगमने त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.