'झिम्मा ३' सिनेमाचं पोस्टर पाहिलंत पण या अभिनेत्याला ओळखलंत का? अमृता सुभाषसोबत जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार

Jhimma 3 Movie Poster | Identify The National Award Winning Marathi Actor: किल्लामधला चिनू आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो आता ‘झिम्मा ३’ मध्ये दिसणार आहे. मात्र अनेकांनी त्याला ओळखलंच नाहीये.
zimma 3 actor

zimma 3 actor

esakal

Updated on: 

लहानपणापासूनच अभिनयाची आवड, कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्याची ओढ आणि प्रत्येक नव्या भूमिकेतून काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता! याच आवडीतून अर्चित देवधरचा अभिनयप्रवास सुरू झाला. ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे अर्चितसाठी हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून त्याच्या अभिनयप्रवासातील एक खास टप्पा ठरणार आहे.

Loading content, please wait...