

Entertainment News : हिंदी चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता जिम सर्भ हा त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. नीरजा, राब्ता आणि संजू यांसारख्या चित्रपटांनंतर त्याला विशेष लोकप्रियता मिळाली ती पद्मावत या चित्रपटामधील मलिक काफूर या भूमिकेमुळे. मात्र यावेळी जिम आपल्या नव्या प्रकल्पामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.