तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित; राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी केलंय स्वरबद्ध

Tumbadchi Manjula First Song Out : लवकरच प्रदर्शित होणाऱ्या झी स्टुडिओज निर्मित तुंबाडची मंजुळा सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Tumbadchi Manjula First Song Out

Tumbadchi Manjula First Song Out

esakal

Updated on

Entertainment News : झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमधील गावकऱ्यांची हटके झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या गावात नेमकं काय वेगळं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्यं म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील सुप्रसिद्ध नाव राहुल देशपांडे आणि गोड गळ्याची गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरांतून या गावाचं दर्शन होणार आहे. या दोघांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळीच उंची देते. या गाण्याच्या निमित्ताने ही दोन नावे प्रथमच एकत्र आली असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com