Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Jr NTR Donated Big Amount To Temple: ज्युनियर एनटीआरनं आंध्र प्रदेशातील चेयेरू येथील श्री भद्रकाली समिती वीरभद्र स्वामी मंदिराला पैसे दान केले आहेत.
Jr NTR
Jr NTRsakal

Jr NTR Donated To Temple: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. ज्युनियर एनटीआरचा 20 मे रोजी वाढदिवस आहे. तसेच त्याचा 'देवरा : पार्ट 1' (Devara Part 1) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे 'भय गाणे' हे काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. अशातच आता ज्युनियर एनटीआर हा सध्या त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्यानं आंध्र प्रदेशातील चेयेरू येथील श्री भद्रकाली समिती वीरभद्र स्वामी मंदिराला 12.5 लाख रुपये दान केले.

ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यानं नुकताच ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. यामध्ये त्यानं आंध्र प्रदेशातील चेयेरू येथील श्री भद्रकाली समिती वीरभद्र स्वामी मंदिराला केलेल्या दानाबद्दल लिहिलं आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्यानंतर ज्युनियर एनटीआरचं अनेकजण कौतुक करत आहेत.

ज्युनियर एनटीआरच्या एका मित्रानं एका मुलाखतीत सांगितलं, "तारक (ज्युनियर एनटीआर) यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वी मंदिराला देणगी दिली, हे खरे आहे. त्याने त्याची आई (शालिनी), पत्नी (लक्ष्मी प्रणती) आणि मुलांची (अभय, बारघव) यांच्या नावानं दान केलं आहे. त्याला दान केल्याबद्दल बोलणं जास्त आवडत नाही. एका चाहत्यांनी ऑनलाइन फोटो शेअर केल्यामुळे लोकांना हे कळले."

ज्युनियर एनटीआरनं यापूर्वी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख, चित्रपट उद्योगातील रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी 25 लाख, कोरोना क्रायसिस चॅरिटीला 25 लाख, अशा अनेक देणग्या दिल्या आहेत.

Jr NTR
Devara Teaser: रक्तात मिसळलेला 'लाल समुद्र' अन् तो... Jr. NTR च्या देवराचा थरारक टीझर बघाच!

ज्युनियर एनटीआरच्या देवरा: भाग 1 या चित्रपटामध्ये त्याच्यासोबतच जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे कलाकार देखील काम करत आहेत. हा चित्रपट यावर्षी 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तसेच ज्युनिअरचा वॉर 2 हा चित्रपट देखील लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com