
मराठी मालिकांतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी आता फक्त अभिनयापुरती मर्यादित राहणार नाहीत, तर शिक्षणातही नवे पाऊल टाकणार आहेत. सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या भूमिकेत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या जुईने नुकतीच तिच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक बातमी शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून उद्यमशीलता विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार