

junglywood
esakal
बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. स्टारकिड्सना मिळणाऱ्या संधी आणि कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारे कलाकार, यांच्यातील दरीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आता हाच विषय एका वेगळ्या अंदाजात मांडणारा 'जंगलीवुड' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली आहे.