दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणार ज्युनिअर एनटीआरचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 8 व्या वर्षी केली होती. त्याचं कुटुंब फक्त सिनेसृष्टीची जोडलेलं नसून राजकारणात सुद्धा सक्रिय आहे. एनटीआरचे आजोबा तेलुगू अॅक्टर होते. तसंच त्याचे वडील अभियनासह राजकारणासुद्धा सक्रीय होते. जरी त्याचं कुटुंब सिनेसृष्टीत सक्रीय होतं तरी ज्युनिअर एनटीआरने स्वत: सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.