राकेश रोनश दिग्दर्शित कहो ना प्यार है चित्रपटाने त्या काळी आपली एक वेगळी छाप पाडली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार गाजला. हृतिकचा अभिनय प्रेक्षकांना फार भावला. 2000 साली सर्वांधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा दोघांचाही हा पहिला चित्रपट होता. परंतु त्या दोघांनाही पहिल्याच चित्रपटाने यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवले.