
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स खूप चर्चेत असतात. त्यातच आता आजी प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावून देणार असल्यामुळे सायली काहीही करून या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी धडपडतेय. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले.