Bollywood News: अभिनेत्री कल्की केकला हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'ये जवानी है दिवानी'नंतर चाहत्यांना ती प्रचंड आवडू लागली. कल्कीने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ती लहानपणापासूनच निसर्गावर प्रेम करते. निसर्गाप्रती तिचा विशेष लगाव आहे. तिचा जन्म पाँडिचेरीमध्ये झाल्याने ती निसर्गाच्या सानिध्यात वाढली. त्यामुळे तिने गरोदरपणात बाळाला पाण्यात जन्म देण्याचा निर्णय घेतला. याला 'वॉटर बर्थ' असही म्हटलं जातं. दरम्यान तिला यावरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं. काही लाोकांना ही पद्धत आघोरी, जादूटोण्याची प्रथा वाटली.