
Bollywood Entertainment News : अभिनेत्री कंगना रनौतचा इमर्जन्सी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला कंगनाच्या बॉलिवूड कारकिर्दीमधील सगळ्यात मोठी ओपनिंग मिळाली आहे.
पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. बॉलिवूडच्या इतर सिनेमांच्या तुलनेत ही कमाई कमी असली तरीही गेल्या पाच वर्षांतील तिच्या रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये सगळ्यात जास्त कमाई या सिनेमाने केली आहे.