
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे
तसेच तिने लिव्हइन रिलेशनशिप आणि कुटुंबाच्या दबावावरही भाष्य केले
Kangana Ranaut News : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पुन्हा एकदा तिच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. नेहमीच तिच्या बेधडक मतांसाठी ओळखली जाणारी कंगना यावेळी लग्न, लिव्हइन रिलेशनशिप आणि कुटुंबाच्या दबावावर बोलली. तिच्या या खुलास्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हॉटरफ्लायशी झालेल्या खास संभाषणात कंगनाने लग्नाबाबत तिचे विचार मांडले. "लग्न ही सुंदर गोष्ट आहे, पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते," असं ती म्हणाली.