Mandi Constitution Election Result 2024 : "तुमच्या सगळ्यांचे..." निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर कंगना यांनी मानले जनतेचे आभार

Kangana Ranaut post after winning election : अभिनेत्री आणि नुकतीच खासदार झालेल्या अभिनेत्री कंगना रनौत यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर जनतेचे आभार मानले.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Esakal

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी मंडी येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांचं आव्हान असताना कंगना यांनी एकहाती विजय प्राप्त केलाय. या विजयानंतर कंगना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मंडीतील जनतेचे त्यांना साथ देण्यासाठी आभार मानले.

Kangana Ranaut
Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, टीम म्हणाली, "आमची क्वीन सध्या देशाप्रती..."

कंगना यांची पोस्ट

सोशल मीडियावर कंगना यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्या म्हणाल्या,"समस्त मंडीवासियों का इस जनाधार, इस प्यार और विश्वास के लिए दिल से आभार🙏🏻

ये जीत आप सभी की है, ये जीत है प्रधानमंत्री मोदी जी और भाजपा पर विश्वास की, ये जीत है सनातन की, ये जीत है मंडी के सम्मान की।" (सगळ्या मंडीवासियांचे त्यांनी दिलेल्या साथीसाठी, विश्वासासाठी आणि प्रेमासाठी मनापासून आभार. हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे, हा विजय पंतप्रधान मोदी जी आणि भाजपावरील विश्वासाचा आहे, हा विजय सनातन धर्माचा आहे, हा विजय आत्मसन्मानाचा आहे.)

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं.

कंगना यांची प्रतिक्रिया

विजय जवळपास निश्चित झाल्यावर कंगना यांनी प्रतिक्रिया दिली कि,"मी आमचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ही निवडणूक लढले. त्यांच्यावर जो लोकांचा विश्वास आहे, त्यांची जी गॅरंटी आहे, लोकांनी दाखवलेल्या विश्वासावरच आम्ही आणि आमचा पक्ष तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. तसंच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हा क्षण मी पाहते आहे. आपण भेटत राहू. मंडी या मतदारसंघाचा विकास मी करणार आहे, तसंच पुढील योजनांबाबत तुमच्याशी यानंतर चर्चा करेन. आता मंडीचं भविष्य उज्वलल असेल." असं त्या म्हणाल्या.

अनुपम खेर यांनी केली कंगनासाठी खास पोस्ट

मंडी मतदार संघातून कंगना विजयी झाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,"माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो"

दरम्यान, कंगना यांची ही पहिलीच निवडणूक असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला आहे. कंगना यांना ५ लाख १४ हजारांपेक्षा जास्त मात मिळाली तर विक्रमादित्य यांना ४ लाख ४२ हजारांहून अधिक मात मिळाली आहेत. जवळपास ७२ हजारांच्या फरकाने कंगना यांचा विजय झाला आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut : कंगनाच्या 'या' वादग्रस्त वक्तव्यांनी उडाली खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com