singers at ambani wedding
singers at ambani wedding sakal

जस्टिन बिबरसोबत अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करणार 'हे' कलाकार, नेटकरी म्हणतात- अंबानींनी तर...

Radhika Merchant And Anant Ambani Sangeet: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी पार पडणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे. हा सोहळा १२ ते १४ जुलैपर्यंत चालणार आहे. या आधी त्यांचे प्रिवेडींग सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. आता त्यांच्या संगीत सोहळ्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. या संगीत सोहळ्यात गाण्यासाठी खास आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बिबर याला आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी त्याने तब्बल ८३ कोटींचं मानधन घेतलं आहे. आता या संगीत सोहळ्याबद्दल नवीन माहिती समोर येते आहे. या संगीत सोहळ्यात जस्टिनसोबत पंजाबी गायक बादशाह आणि करण औजला देखील परफॉर्म करणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, करण औजाला आणि बादशाह एकत्र परफॉर्म करणार आहेत. ते प्लेअर्स, गॉड डॅम आणि डाकू या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या गाण्यांना नक्कीच पंजाबी टच असेल. बादशाह आणि करण यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. आता नेटकरी त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. यासोबतच गायक स्टेबिन बेनदेखील या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथील ग्रँड थिएटरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हा संगीत सोहळा होणार आहे.

कार्यक्रमाचा ड्रेस कोड इंडियन रीगल ग्लॅम आहे. या बातमीवर नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अंबानी प्रत्येक बड्या कलाकाराला आपल्या मुलाचा लग्नात परफॉर्म करण्याचा मान देणार असं नेटकरी म्हणत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

singers at ambani wedding
ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात घाण फसवणूक... एक्स गर्लफ्रेंड पूजा भट्टसोबतच्या नात्याबद्दल बोललाच रणवीर शौरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com