ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात घाण फसवणूक... एक्स गर्लफ्रेंड पूजा भट्टसोबतच्या नात्याबद्दल बोललाच रणवीर शौरी

Ranvir Shorey Bigg Boss Ott: अभिनेता रणवीर शौरी आणि पूजा भट्ट यांचा खूप वाईट पद्धतीने ब्रेकअप झाला होता.
ranvir shorey
ranvir shoreysakal

अभिनेता रणवीर शौरी सध्या 'बिग बॉस ओटीटी ३' मुळे चर्चेत आहे. रणवीरला बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालं आहे त्यामुळे तो आता बिग बॉस मध्ये आला आहे. इथे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहे. नुकतंच त्याने त्याच्या आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं. तिच्यासोबतचं नातं म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी फसवणूक असल्याचं त्याने सांगितलं. रणवीरने यात पूजाचं नाव घेतलं नसलं तरी सगळ्यांना तो कशाबद्दल बोलतोय याचा स्पष्ट अंदाज येतोय.

कोंकणा सेन शर्मा हिच्याशी लग्न करण्याआधी रणवीर हा पूजासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचं खूप वाईट ब्रेकअप झालं होतं. रणवीरने २००२ सालच्या त्या अनुभवाबद्दल सांगितलं जेव्हा तो 'लक्ष्य' या चित्रपटाचं शूटिंग करत होता. तेव्हा त्याला फोन आला की आईची तब्येत बिघडली आहे. पण तेव्हा तो लडाखमध्ये शूटिंग करत होता आणि परत जाऊ शकत नव्हता. रणवीर म्हणाला, 'तेव्हाच मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या स्कँडलला सामोरं जावं लागलं. तेव्हा माझी मोठी फसवणूक झाली. मी यातून बाहेर पडू शकत नव्हतो त्यामुळे माझ्या भावाने मला त्याच्याकडे अमेरिकेला बोलवलं. मी सहा महिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि भावाकडून पैसे उधार घेऊन भारतात आलो. इथे आल्यावर मी 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो'ची शूटिंग सुरू केली.'

रणवीर पुढे म्हणाला, 'तेव्हा माझे २ चित्रपट प्रदर्शनाचे थांबले होते. ते प्रदर्शित झाले आणि हिट ठरले. लोकांना माझं काम आवडलं. तेव्हा मला वाटलं की माझं करिअर सुरू झालंय.' रिपोर्टनुसार, २००० मध्ये पूजा आणि रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. ते लिव्ह इनमध्येही राहायचे. मात्र काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला. रणवीरच्या दारूच्या सवयीने आणि छळवणूक करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. पूजाने एका मुलाखतीत त्याच्यावर हे आरोप लावले होते. मात्र रणवीरने हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. इतर जोडप्यांप्रमाणे आमच्यातही भांडणं होत होती मात्र मी कधीही तिचा छळ केला नाही असं तो म्हणाला.

ranvir shorey
Tu Bhetashi Navyane: वर्षभराने छोट्या पडद्यावर परतली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; सुबोध भावेच्या मालिकेत साकारणार खलनायिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com